Sameer Amunekar
कपूर कुटुंबातील आधार जैननं नुकतंच त्याची मैत्रीण आलेखा अडवाणीसोबत गोव्यात ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. या लग्नाला त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
आधार जैननं त्यांच्या लग्नाचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या जोडप्याच्या लग्नाचा अल्बम खूप सुंदर आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आदर आणि आलेखाचा रोका पार पडला होता. या कार्यक्रमाला करीना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते.
आलेखानं तिचा लूक मॅचिंग नेकलेस आणि कानातले घालून पूर्ण केला. फोटोमध्ये आधार त्याच्या आलेखाचा हात धरलेला दिसत आहे.
लग्नात आधारने पांढऱ्या शर्टसह निळा पँट सूट घातला होता. तो खूपच डॅशिंग दिसत होता.
या फोटोत आधार आणि आलेखा डान्स करताना दिसत आहेत. बाकीचे पाहुणे देखील त्यांच्यासोबच डांस करत आहेत.