Akshata Chhatre
तुम्ही गोव्यात पर्यटनासाठी येता म्हणजे काय करता? समुद्र किनारे फिरता, बरोबर ना.? पण जर तुम्हला आम्ही गोव्याबद्दल काही अनोख्या आणि रंजक गोष्टी सांगितल्या तर?
आज आम्ही तुम्हाला गोव्यातील एका वेगळ्याच मंदिराबद्दल सांगणार आहोत. या मंदिराची खासियत म्हणजे त्याच्या चारही बाजूंनी असलेलं पाणी.
हो! हे मंदिर पाण्यात उभं आहे, मंदिराला चारही बाजूंनी पाण्यानं वेढलेलं आहे. आता हे मंदिर कोणाचं असेल याचा अंदाज देखील तुम्हला आलाच असेल.
फोंडा तालुका हा अनेक मंदिरांसाठी ओळखला जातो. इथेच सावई-वेरे नावाच्या गावात अनंत म्हणजेच विष्णूचं मंदिर आहे, ज्याला मदनांताचं मंदिर असं देखील म्हणतात.
या मंदिरात शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. हातात शंख, चक्र धारण केलेली ही प्रतिमा दगडावर कोरीव काम करून साकारली गेलीये.
मंदिराच्या चारही बाजूंनी असलेलं पाणी क्षीरसागराप्रमणे असून इथे असलेला अनंत अनेकांचं आराध्य दैवत आहे.