Akshata Chhatre
एखाद्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढवायची असेल तर काही घटकांवर काम करणं महत्वाचं असतं.
नवीन ठिकाणी जायचं असेल तर पर्यटक साहजिकपणे विमान प्रवास करतात आणि हा प्रवास जर का कमीत कमी खर्चात होणार असेल तर पर्यटकांकडून त्याला महत्व दिलं जातं.
आपण जेव्हा नवीन ठिकाणी भेट देतो तेव्हा तिथे असणाऱ्या ट्रान्सपोर्टची माहिती घेतो. आपण कसे फिरणार आहोत ही माहिती गरजेची असते.
पर्यटक म्हणजे एखाद्या ठिकाणी नवीन असलेला माणूस, आणि कोणालाही स्वतःची सुरक्षा प्रिय असते त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी असेल तर पर्यटक ती जागा निवडतात.
प्रचंड ट्राफिकमध्ये खोळंबा होणार असेल तर ही गोष्ट कोणालाही रुचत नाही, त्यामुळे पर्यटक कमी ट्राफिक असलेली जागा निवडतात.
अनेकवेळा लोकं टॅक्सीने प्रवास करणं निवडतात, यामध्ये खास करून ओला आणि उबरचा समावेश होतो.