गोमंतकीय कलाकारांचे अनोखे जग! 'अ ड्रिम इन बाल्कांव' प्रदर्शन

Sameer Panditrao

गोवा ओपन आर्टस्

'गोवा ओपन आर्टस्'चे यावर्षीचे पहिले प्रदर्शन, 'अ ड्रिम इन बाल्कांव', कालपासून आसगाव येथील 'विला २५९' मध्ये सुरू झाले आहे.

A Dream in the Balcao

बाल्कांव

बाल्कांव ही गोव्याच्या घरातील उंबरठ्यापलीकडील जागा, जी संक्रमणाचे रूपक बनते. ती अंतर्मनाच्या विचारांना बाहेरील जगाशी जोडते.

A Dream in the Balcao

गोव्याचे भावविश्व

या प्रदर्शनात प्रसिद्ध गोमंतकीय चित्रकारांनी सादर केलेल्या चित्रांतून गोव्याचे जीवन आणि कलासंवेदना अनुभवायला मिळते.

A Dream in the Balcao

विविधतेत सौंदर्य

चित्रकला, मुद्रण, रेखाचित्र, शिल्पकला, आणि छायाचित्रण अशा अनेक माध्यमांचे कलाकृती येथे पाहायला मिळतात.

A Dream in the Balcao

स्थानिक कलाकारांना मंच

प्रतिभावंत गोमंतकीय कलाकारांच्या कलाकृती परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे हे प्रदर्शनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

A Dream in the Balcao

संगम

नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर, 'अ ड्रिम इन बाल्कांव' प्रदर्शन विचारांना खेळकरतेचा नवा अर्थ देते.

A Dream in the Balcao

वेळ आणि ठिकाण

'अ ड्रिम इन बाल्कांव' हे प्रदर्शन २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सर्वांसाठी खुले आहे. आसगाव येथील 'विला २५९' या जागी या अनुभवाचा आस्वाद घ्या!

A Dream in the Balcao
गोव्यातील हा 'पक्षी महोत्सव' चुकवू नका