Manish Jadhav
पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे. येत्या 8 तारखेला पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. तत्पूर्वीचं, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानी न्यायालये धक्क्यावर धक्के देत आहेत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्या लग्नाला न्यायालयाने शनिवारी गैर-इस्लामिक घोषित केले.
बुशरा बीबीच्या पहिल्या पतीने केलेल्या तक्रारीवरुन कोर्टाचा निर्णय आला आहे. दोघांचे लग्न इद्दत दरम्यान झाल्याचा दावा करण्यात आला.
या प्रकरणात इम्रान आणि बुशरा बीबी यांना रावळपिंडी कोर्टाने 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. चला तर मग जाणून घेऊया इद्दत आहे का, ज्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या इम्रान यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
इस्लाममध्ये शरिया कायद्यानुसार विवाह होतो. शरीयतनुसार जर एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर तिला पुनर्विवाह करण्यापूर्वी काही काळ थांबावे लागते. या कालावधीला 'इद्दत' म्हणतात.
इम्रान खान आणि बुशरा बीबी यांचा विवाह करणाऱ्या काझी मौसवी मुफ्ती सईद यांनीही या दोघांचे लग्न शरिया कायद्यानुसार नसल्याचे म्हटले होते. काझींच्या मते, इस्लाममध्ये इद्दतचा कालावधी 4 महिने आणि 10 दिवस आहे.
आधीच इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) त्यांच्या निवडणूक चिन्हाशिवाय (बीएटी) निवडणूक लढवत आहे.
इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. सध्या ते रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. सायफर प्रकरणात त्यांना ऑफिशियल इंटेलिजन्स ॲक्ट अंतर्गत 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.