गोमन्तक डिजिटल टीम
योग्य आहार, सदृढ आरोग्य असं आपण नेहमीच ऐकत आलो आहे. हल्ली इतरांचं ऐकून स्वत: चं डाएट ठरवतो. पण हीच मोठी चूक आहे.
डाएट ठरवण्यापूर्वी आपण स्वत: ला काही प्रश्न विचारावेत. अचानक खाण्यापिण्यावर बंधन घालून काहीही फायदा होणार नाही.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची पचनक्रीया कशी आहे हे आधी समजून घ्या. कोणते पदार्थ खाल्ल्यावर पचनाचा त्रास होतो का याकडे लक्ष द्या.
शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांनी डाएटमध्ये कॅलरीजबाबत फार विचार करू नये. अशा वयोगटातील व्यक्तींनी प्रोटिनयुक्त अन्न खावं.
तुमचं वय वाढते तशी तुमची पचनशक्ती कमकुवत होते, हे सत्य स्वीकारावा. वाढत्या वयासोबत आहारही बदलावा लागतो.
आहारात तीस टक्के कच्च्या भाज्यांचा समावेश असलाच पाहिजे, याकडे लक्ष द्या.
काहीही खाल्ल्यानंतर तुम्हाला जड अथवा अपचन होत असेल तर आहार हा हलका ठेवावा.
फक्त आहारामुळे आरोग्य सुधारणार नाही. त्याला व्यायामाची जोड हवी. कॉलेजमधील तरुणांना दिवसाला दीड तास व्यायाम करावा.