Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये रायगडाची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली. या किल्ल्याचे भौगोलिक स्थान आणि अभेद्यता यामुळे याला 'पूर्वेकडील जिब्राल्टर' असेही म्हटले जाते.
6 जून 1674 रोजी याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि ते 'छत्रपती' झाले.
रायगडाचे बांधकाम मुख्य वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांनी केले होते. किल्ल्याचे प्रवेशद्वार, बाजारपेठ आणि राजवाडा यांचे नियोजन आजही इंजिनिअर्संना थक्क करते.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची पावन समाधी आहे. या ठिकाणी जगभरातील शिवभक्त नतमस्तक होण्यासाठी येतात.
किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच 'महादरवाजा' अत्यंत भक्कम आहे. शत्रूला सहजासहजी हा दरवाजा शोधता येऊ नये, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे.
किल्ल्यावर एक मोठी बाजारपेठ आहे. विशेष म्हणजे, या बाजारपेठेत घोड्यावर बसून खरेदी करता येईल अशा पद्धतीने दुकानांची रचना करण्यात आली होती.
रायगडावरील 'टकमक टोक' हे ठिकाण त्याच्या भीषण उंचीसाठी ओळखले जाते. स्वराज्यातील गद्दारांना आणि गुन्हेगारांना इथून दरीत ढकलून फाशीची शिक्षा दिली जात असे.
आपल्या बाळासाठी एका रात्रीत गडाची कडा उतरून गेलेल्या माता 'हिरकणी'च्या धाडसाची आठवण म्हणून महाराजांनी येथे 'हिरकणी बुरुज' उभारला.
गडावरील राजसभेत महाराजांचे 32 मण सोन्याचे भव्य सिंहासन होते. आज तिथे त्या सिंहासनाचा चौथरा असून तो शिवप्रेमींच्या आदराचे स्थान आहे.