Manish Jadhav
आजच्या डिजिटल युगात मोबाईल सर्वात मोठा अडथळा ठरतोय. आठवड्यातून किमान एक रात्र अशी ठेवा, जिथे तुम्ही दोघेही तुमचे फोन बाजूला ठेवून फक्त एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा माराल.
केवळ जेवण बनवणे हा उद्देश नसून, एकमेकांच्या आवडीचे पदार्थ एकत्र मिळून बनवण्यात एक वेगळीच मजा असते. स्वयंपाकघरातील हे छोटे-मोठे क्षण तुमच्यातील जवळीक वाढवतात.
तुमचे लग्नाचे अल्बम किंवा जुने फोटो एकत्र बसून पाहा. तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटलात, तेव्हा काय घडलं होतं, या आठवणींना उजाळा दिल्याने नात्यात पुन्हा नवा ताजेपणा येतो.
सकाळी लवकर उठून फिरायला जाणे किंवा एकत्र योगा-वर्कआउट करणे, हा क्वालिटी टाइम घालवण्याचा उत्तम मार्ग आहे. यामुळे आरोग्यही जपले जाते आणि एकमेकांसोबत वेळही मिळतो.
जर तुम्हाला वाचनाची आवड असेल आणि जोडीदाराला पेंटिंगची, तर एकमेकांच्या छंदांमध्ये सहभागी व्हा. एकमेकांकडून नवीन गोष्टी शिकण्यातून आदराची भावना वाढते.
रात्रीच्या जेवणानंतर 10-15 मिनिटे शांतपणे चालायला जा. थंड हवेत हात हातात घेऊन चालताना होणाऱ्या गप्पा कोणत्याही महागड्या हॉटेलमधील डिनरपेक्षा जास्त सुखद असतात.
कधीकधी लहान होऊन एकत्र लुडो, बुद्धिबळ किंवा एखादे कठीण कोडे सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे घरातील वातावरण हलके-फुलके राहते आणि खेळीमेळीचा संवाद वाढतो.
तुम्हाला भविष्यात एकत्र कुठे फिरायला जायचे आहे किंवा कोणती स्वप्ने पूर्ण करायची आहेत, याची एक यादी तयार करा. यामुळे तुम्हाला एकमेकांच्या भविष्यातील इच्छा समजण्यास मदत होईल.