Manish Jadhav
हळद ही आरोग्यासाठी फायदेशीर असली, तरी तिचे अति प्रमाणात सेवन (Overconsumption) केल्यास काही दुष्परिणाम (Side Effects) देखील होऊ शकतात.
जास्त प्रमाणात हळद खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस होणे, अतिसार किंवा पोटदुखी यांसारखे पचनाचे त्रास होऊ शकतात.
हळदीमुळे पोटात ऍसिडचे उत्पादन वाढू शकते. यामुळे छातीत आणि पोटात जळजळ किंवा ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
हळदीत ऑक्सालेट (Oxalates) नावाचे घटक असतात. जास्त प्रमाणात ऑक्सालेटमुळे किडनीमध्ये स्टोन (खडे) तयार होण्याचा धोका वाढू शकतो.
अति हळदीमुळे शरीरात लोह आणि इतर काही आवश्यक पोषक तत्वांचे शोषण होण्याची प्रक्रिया कमी होऊ शकते.
काही व्यक्तींना हळदीची ऍलर्जी असू शकते. जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्वचेवर पुरळ, खाज किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
हळदीचा रक्त पातळ करणाऱ्या किंवा मधुमेह विरोधी औषधांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे औषधांचा प्रभाव बदलू शकतो.
हळद पित्ताशयाला उत्तेजित करते. ज्यांना पित्ताशयाचे आजार आहेत, त्यांना जास्त हळदीमुळे त्रास वाढू शकतो.