Manish Jadhav
जगभरात महिलांसंबंधित गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच चालले आहे. महिला असुरक्षितता ही एक मोठी समस्या बनली आहे.
आजकाल अनेक महिला पर्यटक जगातील नवीन ठिकाण पाहण्यासाठी विविध देशांमध्ये प्रवास करत असतात. तत्पूर्वी, आज (11 फेब्रुवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून महिलांसाठी असुरक्षित असणाऱ्या देशांबद्दल जाणून घेणार आहोत.
महिला पर्यटकांसाठी सर्वात धोकादायक देश म्हणून दक्षिण आफ्रिका या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या देशात महिलांच्या हत्या मोठ्याप्रमाणात होतात.
जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारा ब्राझील या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. महिला पर्यटकांसाठी ब्राझीलही असुरक्षित देश आहे.
महिला असुरक्षिततेच्या यादीत रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिलांच्या हेतुपुरस्सर खूनाच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये रशियात वाढल्या आहेत.
महिला पर्यटकांसाठी असुरक्षित असलेल्या देशांच्या यादीत मेक्सिको चौथ्या स्थानी आहे. येथे महिला हिंसाचाराचे प्रमाण जास्त आहे. येथे महिला पर्यटकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
वुमन डेंजर इंडेक्सनुसार इराण हा देश महिला असुरक्षिततेमध्ये पाचव्या क्रमांकावर येतो. इथे लैंगिकतेच्या आधारावर भेदभाव केला जातो.
महिला पर्यटकांसाठी असुरक्षित असलेल्या देशांच्या यादीत इजिप्त हा देश सहाव्या स्थानावर आहे.
महिला पर्यटकांच्या असुरक्षिततेमध्ये मोरोक्को हा सातव्या क्रमांकावर आहे. येथे रात्रीच्या वेळी फिरणे महिला पर्यटकांसाठी धोकादायक आहे.
या यादीत भारताचा क्रमांक नववा आहे. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.