Manish Jadhav
केशरयुक्त दूध आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानले जाते. केशरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट केशर दूध प्यायल्याने डोके शांत होते आणि निद्रानाशाची समस्या दूर होऊन शांत झोप लागते.
केशर दुधामुळे रक्त शुद्ध होते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि मुरुमांच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
हे दूध मेंदूच्या पेशींना चालना देते, ज्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय फायदेशीर आहे.
केशरमधील घटक कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
हिवाळ्यात केशर दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते आणि सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो.
केशर दूध पोटातील जळजळ कमी करते आणि पचन संस्था सुरळीत चालवण्यास मदत करते.
केशरमधील 'सॅफ्रनल' घटक नैराश्य आणि मानसिक तणाव कमी करून मूड फ्रेश ठेवण्यास मदत करतात.