Manish Jadhav
दौलताबाद हा जगातील सर्वात सुरक्षित किल्ल्यांपैकी एक मानला जातो. या किल्ल्याची रचना अशी आहे की, शत्रूला मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य होते.
किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याच्याभोवती 50 फूट खोल आणि रुंद असा खंदक खोदलेला आहे. पूर्वी या खंदकात मगरी सोडल्या जात असत, जेणेकरुन शत्रू पोहून आत येऊ शकणार नाही.
किल्ल्यावर 'अंधारी' नावाची एक गुंतागुंतीची वाट आहे. शत्रू आत शिरल्यास त्यांना गोंधळात टाकण्यासाठी आणि त्यांच्यावर गरम तेल किंवा पाणी टाकण्यासाठी ही वाट बनवली होती.
हा किल्ला केवळ यादव राजघराण्याचीच नव्हे, तर खिलजी, तुघलक आणि बहामनी अशा विविध सत्तांची राजधानी राहिलेला आहे.
इतिहासात हा किल्ला तेव्हा प्रसिद्ध झाला जेव्हा मोहम्मद बिन तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता.
किल्ल्याच्या आवारात 210 फूट उंच 'चांद मीनार' आहे. हा मीनार विजयाचे प्रतीक म्हणून बांधला गेला असून तो इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
हा किल्ला एका नैसर्गिक उभ्या डोंगरावर कोरलेला आहे. डोंगराचा भाग इतका गुळगुळीत आणि सरळ आहे की त्यावर पाल किंवा सापही चढू शकणार नाही, असे म्हटले जाते.
किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर 'मेंढा तोफ' आहे. या तोफेवर मेंढ्याचे मुख कोरलेले असून ती आजही सुस्थितीत आहे, जी पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरते.