Sameer Amunekar
चेहऱ्यावर मेकअप ठेवून झोपल्याने त्वचेचे छिद्र बंद होतात, ज्यामुळे पिंपल्स, डाग आणि त्वचा कोरडी पडू शकते.
ओले केस घेऊन झोपल्याने केस गुंततात, तुटतात आणि डोक्याला थंडी लागून सर्दी होऊ शकते.
घट्ट कपडे घातल्याने इरिटेशन, इंफेक्शन किंवा अस्वस्थ झोप होऊ शकते.
मोबाईलच्या निळ्या प्रकाशामुळे झोपेचा नैसर्गिक रिथम बिघडतो, परिणामी डोळ्यांवर ताण आणि झोपेचा त्रास होतो.
चुकीच्या उशांमुळे मानेला त्रास, पाठदुखी किंवा झोपेचा पूर्ण आराम मिळत नाही.
झोपण्याच्या आधी जड अन्न खाल्ल्यामुळे पचन नीट होत नाही आणि झोपेचा दर्जा कमी होतो.
उशीवर साचलेले तेल, धूळ, घाम यामुळे त्वचेवर पुरळ येऊ शकतात. उशीचे कव्हर आठवड्यातून एकदा तरी बदलणे गरजेचे आहे.