Parenting Tips: मोबाईल सुटणार, मुले मैदानावर धावणार! पालकांनो, स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी आजच अंमलात आणा 'हे' 7 नियम

Manish Jadhav

'नो-स्क्रीन झोन' तयार करा

घरातील काही जागा, जसे की जेवणाचे टेबल आणि बेडरुम या ठिकाणी मोबाईल किंवा टीव्ही वापरण्यावर पूर्ण बंदी घाला. यामुळे जेवताना आणि झोपताना स्क्रीनचे व्यसन लागणार नाही.

child's phone addiction | Dainik Gomantak

स्क्रीन वेळेचे निश्चित वेळापत्रक

मुलांना दिवसातून किती वेळ स्क्रीन पाहायची आहे (उदा. 30 ते 45 मिनिटे) याचे निश्चित वेळापत्रक बनवा. वेळ संपताच स्वतःहून स्क्रीन बंद करण्याची सवय त्यांना लावा.

child's phone addiction | Dainik Gomantak

मैदानी खेळांना प्रोत्साहन द्या

मुलांना सायकलिंग, क्रिकेट, बॅडमिंटन किंवा बागेत खेळण्यासाठी प्रवृत्त करा. शारीरिक हालचालींमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहते आणि स्क्रीनची आठवण येत नाही.

child's phone addiction | Dainik Gomantak

छंद आणि क्रिएटिव्ह कामात गुंतवा

चित्रकला, हस्तकला (क्राफ्ट), वाचन, संगीत किंवा विविध कोडी (Puzzles) सोडवणे अशा सर्जनशील गोष्टींमध्ये मुलांना व्यस्त ठेवा, जेणेकरुन त्यांचा वेळ सत्कारणी लागेल.

child's phone addiction | Dainik Gomantak

पालकांनी स्वतः 'रोल मॉडेल' बना

मुले नेहमी पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे मुलांसमोर स्वतः सतत मोबाईल वापरणे टाळा. तुम्ही डिजिटल डिटॉक्स पाळल्यास मुलेही त्याचे सहज पालन करतील.

child's phone addiction | Dainik Gomantak

एकत्र फॅमिली टाईम घालवा

दररोज रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत बोर्ड गेम्स (कॅरम, बुद्धिबळ, लुडो) खेळा किंवा गप्पा मारा. पालकांचा दर्जेदार वेळ मिळाल्यास मुले मोबाईलकडे जाणार नाहीत.

child's phone addiction | Dainik Gomantak

डिजिटल डिटॉक्स डे

आठवड्यातून एक दिवस (उदा. रविवार) किंवा काही तास पूर्ण कुटुंबासाठी 'नो गॅजेट्स डे' म्हणून पाळा. या काळात निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाणे किंवा नातेवाईकांना भेटणे असे प्लॅन करा.

child's phone addiction | Dainik Gomantak
आणखी बघा