Manish Jadhav
खुला आणि प्रामाणिक संवाद ठेवा. एकमेकांचे ऐका आणि समजून घ्या. वाद झाल्यास शांतपणे तो सोडवण्याचा प्रयत्न करा.
एकत्र वेळ घालवा, अगदी व्यस्त दिनचर्येतूनही. आठवड्यातून किमान एक दिवस खास बनवा. मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहून एकमेकांवर लक्ष केंद्रित करा.
एकमेकांसाठी छोटे सरप्रायझेस द्या. आवडत्या पदार्थांची किंवा गिफ्टची भेट द्या. रोज एक तरी प्रेमळ गोष्ट एकमेकांसाठी करा.
नात्यात प्रामाणिक राहा. छोट्या गोष्टी लपवू नका; त्या मोठ्या समस्या निर्माण करु शकतात. एकमेकांवर विश्वास ठेवा आणि तो टिकवण्याचा प्रयत्न करा.
नवीन छंद जोडा किंवा नवीन अनुभव घ्या. प्रवास करा, नवीन ठिकाणं एक्सप्लोर करा. एकत्र कुकिंग, वर्कआउट किंवा कोणताही नवीन उपक्रम करा.
परस्परांच्या भावना समजून घ्या. राग आल्यावरही तो संयमानं व्यक्त करा. चुका माफ करण्याची सवय लावा.
कठीण काळात एकमेकांना साथ द्या. मनमोकळ्या गप्पा मारा आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. एकत्र ध्येय ठेवा आणि त्या दिशेने काम करा.