गोमंतक ऑनलाईन टीम
टरबूजमध्ये ९२% पाणी असते. हे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सर्वोत्तम फळ आहे. यातील 'लायकोपीन' त्वचेचे उन्हापासून संरक्षण करते.
फळभाजी असली तरी उन्हाळ्यात ती फळाप्रमाणेच खाल्ली जाते. काकडी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते आणि शरीराला नैसर्गिक थंडावा देते.
उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पोटॅशियम बाहेर जाते. संत्री खाल्ल्याने पोटॅशियमची कमतरता भरून निघते आणि 'व्हिटॅमिन सी'मुळे प्रतिकारशक्ती वाढते.
द्राक्षांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते आणि ती झटपट ऊर्जा देतात. रसाळ द्राक्षे खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि थंडावा मिळतो.
पपई पचनासाठी उत्तम मानली जाते. उन्हाळ्यात पचनक्रिया मंदावते, अशा वेळी पपई खाल्ल्याने पोट साफ राहते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो.
लिंबू सरबत हे उन्हाळ्यातील सर्वात स्वस्त आणि मस्त पेय आहे. हे शरीराला फक्त थंडच ठेवत नाही, तर उन्हामुळे येणारा थकवाही क्षणात दूर करते.
खरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात. हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास आणि शरीरातील उष्णता शोषून घेण्यास मदत करते.