Child Health: चिमुकल्यांचे संरक्षण! कडाक्याच्या उन्हात बाळाला 'कूल' ठेवण्यासाठी 7 खास टिप्स

Sameer Amunekar

सुती, हलक्या कपड्यांचा वापर

बाळाला उन्हाळ्यात गडद रंगाचे किंवा जाड कपडे घालणे टाळा. त्याऐवजी हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा. यामुळे हवेची हालचाल नीट होते आणि बाळाला घाम कमी येतो.

Summer Child Health | Dainik Gomantak

हायड्रेशनवर भर

जर बाळ ६ महिन्यांपेक्षा लहान असेल, तर त्याला वारंवार अंगावरचे दूध पाजावे. बाळ ६ महिन्यांपेक्षा मोठे असल्यास त्याला पाणी, घरगुती फळांचा रस किंवा नारळपाणी देऊन हायड्रेटेड ठेवावे.

Summer Child Health | Dainik Gomantak

बाहेर जाण्याची वेळ पाळा

सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत उन्हाचा कडाका सर्वाधिक असतो. शक्यतो या काळात बाळाला घराबाहेर नेणे टाळावे.

Summer Child Health | Dainik Gomantak

दोनदा कोमट पाण्याने स्नान

बाळाला उन्हाळ्याच्या दिवसात ताजेतवाने ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा कोमट पाण्याने अंघोळ घाला किंवा ओल्या सुती कापडाने त्याचे शरीर पुसून घ्या.

Summer Child Health | Dainik Gomantak

डायपरचा वापर मर्यादित ठेवा

उन्हाळ्यात डायपरमुळे बाळाला रॅशेस किंवा घामोळ्या येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घरच्या घरी असताना बाळाला सुती लंगोट वापरा आणि काही वेळ 'डायपर फ्री' ठेवा.

Summer Child Health | Dainik Gomantak

हवेशीर वातावरण

बाळ ज्या खोलीत झोपते, ती खोली हवेशीर आणि थंड ठेवा. कुलर किंवा एसी वापरताना त्याचे वारे थेट बाळाच्या अंगावर येणार नाही याची काळजी घ्या. खोलीतील तापमान २५°C ते २७°C च्या दरम्यान ठेवणे योग्य ठरते.

Summer Child Health | Dainik Gomantak

त्वचेची काळजी

उन्हाळ्यात भर दुपारी तेलाने मसाज करणे टाळा, कारण त्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊन घामोळ्या येऊ शकतात. त्याऐवजी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी हलक्या हाताने मसाज करा.

Summer Child Health | Dainik Gomantak

उन्हाळ्यात फॅमिलीसोबत समुद्रस्नानासाठी कोकणातील 'हा' बीच आहे परफेक्ट

Shiroda Beach Konkan summer vacation | Dainik Gomantak
येथे क्लिक करा