Manish Jadhav
भांडण किंवा वाद झाल्यानंतर समस्येवर तोडगा काढण्याऐवजी जोडीदार पूर्णपणे बोलणे बंद करत असेल, तर हा एक मोठा रेड फ्लॅग आहे. संवादाऐवजी मौनाचा शस्त्र म्हणून वापर केल्याने नात्यातील अंतर वाढू लागते.
फोन लपवणे, पासवर्ड अचानक बदलणे किंवा स्वतःच्या आयुष्यातील साध्या गोष्टी शेअर न करणे. जेव्हा आधी उघडेपणाने बोलणारा जोडीदार अचानक गोष्टी लपवू लागतो, तेव्हा नात्यातील विश्वास कमकुवत होतो.
नात्यात शारीरिक आणि भावनिक जवळीक कमी होणे. हात पकडणे, मिठी मारणे किंवा एकमेकांचे कौतुक करणे पूर्णपणे थांबले असेल, तर समजून जा की नात्यातील प्रेम आणि आकर्षण ओसरत चालले आहे.
उघडपणे बोलण्याऐवजी चार चौघांत किंवा घरात टोमणे मारणे, जोक्सच्या नावाखाली जोडीदाराच्या उणिवांवर बोट ठेवणे. या सवयीमुळे समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास हळूहळू नष्ट होतो.
प्रत्येक चुकीचे किंवा भांडणाचे खापर तुमच्यावरच फोडणे. जोडीदार स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही आणि तुम्हालाच सतत गुन्हेगार ठरवून अपराधीपणाची भावना निर्माण करतो.
तुमच्या यशामध्ये किंवा स्वप्नांमध्ये जोडीदाराला अजिबात रस नसणे. तुम्ही मिळवलेल्या यशाचे कौतुक न करणे किंवा तुमच्या प्रगतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हे नात्यातील भावनिक दुराव्याचे लक्षण आहे.
भविष्यातील प्लॅन्स असोत वा रोजच्या आयुष्यातील निर्णय, तुमचे मत न विचारता परस्पर निर्णय घेणे. नात्यात तुमचा आदर आणि सहभाग कमी होणे हा एक अत्यंत धोकादायक सायलेंट रेड फ्लॅग आहे.