Relationship Problems: नात्यात दुरावा येण्याआधी मिळतात 'हे' 7 संकेत; दुर्लक्ष करणे ठरु शकते घातक!

Manish Jadhav

नात्यात दुरावा येण्याचे संकेत

नात्यात दुरावा येत चाललाय, असे वाटत असेल तर जोडीदाराने वेळीच सावध झाले पाहिजे. आज आपण या वेबस्टोरीसाठी माध्यमातून नात्यात दुरावा येण्याचे संकेत जाणून घेणार आहोत.

Relationship Tips | Dainik Gomantak

संवादाची कमतरता

पूर्वीसारख्या गप्पा आणि मनमोकळा संवाद कमी होऊन फक्त गरजेपुरतेच बोलणे उरणे. यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

Relationship Tips | Dainik Gomantak

भावनिक अंतर

एकमेकांच्या आनंदात किंवा दुःखात पूर्वीसारखा सहभाग आणि आपुलकी न जाणवणे.

Relationship Tips | Dainik Gomantak

भावनिक अनास्था

एकमेकांच्या आनंदात किंवा दुःखात पूर्वीसारखा सहभाग, कौतुक आणि आपुलकी जाणवत नाही. एकमेकांच्या आयुष्यात काय चालले आहे याबद्दल उदासीनता निर्माण होणे हे दुराव्याचे मोठे लक्षण आहे.

Relationship Tips | Dainik Gomantak

किरकोळ गोष्टींवरुन सतत वाद

लहान-सहान कारणांवरुन चिडचिड होणे आणि संभाषणाचे रुपांतर भांडणात होणे. संयमाची जागा जेव्हा रागाने घेतली जाते, तेव्हा परस्पर आदर आणि समंजसपणा संपू लागतो.

Relationship Tips | Dainik Gomantak

एकत्र वेळ घालवणे टाळणे

मोकळ्या वेळेत सोबत राहण्याऐवजी मित्र, काम किंवा फोनमध्ये व्यस्त राहणे.जेव्हा जोडीदारासोबत घालवलेल्या वेळेपेक्षा दूर राहणे जास्त आरामदायक वाटते, तेव्हा अंतर वाढते.

Relationship Tips | Dainik Gomantak

शारीरिक व मानसिक अंतर

स्पर्शातील ऊब नाहीशी होणे आणि एकमेकांपासून शारीरिक अंतर राखणे. नात्यातील रोमान्स आणि आपुलकीचा स्पर्श कमी होणे हे भावनिक दुराव्याचे थेट प्रतीक आहे.

new relationship tips | Dainik Gomantak

Gwalior Fort: शाही राजकुमारांची अखेरची रात्र! औरंगजेबाने स्वतःच्याच भावाला अन् पुतण्याला मारुन टाकलं; ग्वाल्हेरच्या किल्ल्याचा थरारक इतिहास

आणखी बघा