Manish Jadhav
दिवसभरात कितीही व्यस्त असलात, तरी रोज 15 ते 20 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारा. दिवसाची सुरुवात किंवा शेवट एकत्र चहा पिऊन केल्यास नात्यात वेगळाच गोडवा निर्माण होतो.
जोडीदाराने केलेल्या छोट्या मदतीसाठी किंवा त्यांच्या नव्या लूकसाठी मनापासून कौतुकाची थाप नक्की द्या. शब्दांत व्यक्त केलेले हे छोटे थँक्यू नात्यातील आदर आणि प्रेम द्विगुणित करते.
सरप्राईज देण्यासाठी वाढदिवस किंवा ॲनिव्हर्सरीसारख्या खास दिवसांची वाट पाहणे सोडून द्या. अचानक दिलेली कॉफी डेट किंवा एखादे आवडते फूल नात्यात नवा ताजेपणा आणते.
कामाला निघताना दिलेली घट्ट मिठी किंवा हातांमध्ये हात धरुन चालणे नात्याला भावनिकदृष्ट्या जोडते. हा लहानसा स्पर्शही रोजच्या आयुष्यातील तणाव दूर करुन रोमान्स जिवंत ठेवतो.
पहिल्या डेटचे फोटो, लग्नाचे व्हिडिओ किंवा एकत्र घालवलेले रोमँटिक क्षण एकत्र बसून आठवा. जुन्या आठवणी पुन्हा जिवंत केल्याने सुरुवातीचे तेच वेडे प्रेम पुन्हा अनुभवायला मिळते.
जोडीदाराचा आवडता पदार्थ एकत्र बनवा किंवा आठवड्यातून एकदा त्यांच्या आवडीचे काम करा. एकमेकांच्या आवडीचा आदर केल्याने जोडीदाराला नात्यात आपलेपणा आणि महत्त्व वाटते.
घरच्या जबाबदाऱ्यांमधून थोडा वेळ काढून वीकेंडला लाँग ड्राईव्ह किंवा नाईट वॉकसाठी बाहेर पडा. रोजच्या रुटीनमधून मिळालेला हा ब्रेक कपलला एकमेकांच्या पुन्हा जवळ आणतो.