Manish Jadhav
कोणतेही उघड कारण नसताना सतत मनात वाईट घडण्याची शंका येणे हे अँक्झायटीचे प्रमुख लक्षण असू शकते. या मानसिक स्थितीमध्ये मेंदू सतत धोक्याचे संकेत देत राहतो, ज्यामुळे व्यक्ती मनातल्या मनात सतत घाबरलेली असते.
भूतकाळात घडलेली एखादी दुर्घटना, अपघात किंवा मोठा मानसिक धक्का माणसाच्या मनात खोलवर रुजतो. त्या जुन्या आठवणी किंवा कटू अनुभव भविष्यात पुन्हा समोर येतील या विचाराने मनात भीतीची भावना सतत जागी राहते.
काम, आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक समस्यांमुळे जास्त कालावधीसाठी मानसिक ताण राहिल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होतो. प्रचंड ताणामुळे मेंदूत 'फाईट ओर फ्लाईट' (Fight or Flight) हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे सतत भीती आणि भीती वाटते.
'मी चुकलो तर काय होईल?' किंवा 'लोक माझ्याबद्दल काय विचार करतील?' हा विचार सतत मनात घोळणे. आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे आणि अपयशाच्या भीतीपोटी कोणतीही नवीन गोष्ट करताना मनात सतत भीती राहते.
कोणत्याही प्रसंगाचा किंवा गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्याने न घडणाऱ्या गोष्टीही खऱ्या वाटू लागतात. ओव्हरथिंकिंगमुळे मन भविष्यातील नकारात्मक शक्यतांचे चित्र निर्माण करते, ज्यामुळे अस्वस्थता आणि भीती वाढते.
एखाद्या विशिष्ट गोष्टीची (उदा. गर्दी, बंद जागा, आजार किंवा उंची) अवास्तव आणि तीव्र भीती असणे. या फोबियामुळे ती विशिष्ट परिस्थिती समोर येताच किंवा त्याचा विचार येताच व्यक्ती प्रचंड घाबरुन जाते.
दीर्घकाळ नैराश्यात राहिल्याने माणसाला सुरक्षिततेची भावना उरत नाही आणि मनात नकारात्मकता घर करते. नैराश्यामुळे भविष्याबद्दल अविश्वास निर्माण होतो आणि आयुष्याला सामोरे जाण्याची भीती सतत सतावत राहते.