Sameer Amunekar
पुणे आणि कोकणाला जोडणारा हा घाट पावसाळ्यात स्वर्गासारखा दिसतो. दाट धुके, चहूबाजूंनी वाहणारे धबधबे आणि हिरवेगार डोंगर हे इथले मुख्य आकर्षण आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा घाट जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील 'आंबोली धबधबा' पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.
केरळमधील हा घाट चहाच्या मळ्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. वळणावळणाचे रस्ते आणि डोंगररांगांवर पसरलेली हिरवी शाल पर्यटकांना भुरळ घालते.
'दक्षिण भारताची चेरापुंजी' म्हणून ओळखला जाणारा हा घाट शिमोगा जिल्ह्यात आहे. येथील सूर्यास्ताचे दृश्य आणि घनदाट जंगल अतिशय सुंदर आहे.
ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला हा घाट ट्रेकर्सचा आवडता आहे. येथील पावसाळी वातावरण आणि स्थलांतरित 'फ्लेमिंगो' पक्षी हे विशेष आकर्षण ठरतात.
मनालीपासून जवळ असलेला हा घाट बर्फाच्छादित शिखरांसाठी ओळखला जातो. साहसी पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी आणि हिमालयाचे सौंदर्य पाहण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
तीन राज्यांच्या सीमेवर असलेला हा घाट पश्चिम घाटाचे खरे सौंदर्य दर्शन घडवतो. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.