Saree Jewellery Styling Tips: परफेक्ट साडी लूकसाठी दागिन्यांची स्मार्ट निवड या सोप्या टिप्स करा

दैनिक गोमन्तक डिजिटल

काठ अन् वर्कनुसार मेटल निवडा

साडीवर सोनेरी (Gold) काठ असेल तर सोन्याचे किंवा टेम्पल ज्वेलरी निवडा. चांदीचा (Silver/Zari) काठ किंवा बॉर्डर असल्यास ऑक्सिडाईज्ड किंवा सिल्व्हर दागिने परिधान करा.

Saree Jewellery Styling Tips | Dainik Gomantak

ब्लाऊजच्या नेकलाईनचा विचार करा

बोट नेक किंवा हाय नेक ब्लाऊजवर लांब हार (Long Necklace) किंवा फक्त मोठे ईअररिंग्स (Earrings) छान दिसतात. तर व्ही-नेक (V-neck) किंवा डीप गळ्यावर शॉर्ट नेकपीस किंवा चोकर शोभून दिसतो.

Saree Jewellery Styling Tips | Dainik Gomantak

हेव्ही साडी, सिम्पल ज्वेलरी

पैठणी, कांजीवरम किंवा जड वर्क असलेली साडी असेल, तर खूप जास्त दागिने न घालता एखादा स्टेटमेंट हार किंवा फक्त मोठे ईअररिंग्स घालून लूक बॅलन्स करा.

Saree Jewellery Styling Tips | Dainik Gomantak

प्लेन साडीवर 'हटके' दागिने

साधी किंवा प्लेन कॉटन/जॉर्जेट साडी असेल, तर त्यावर ऑक्सिडाईज्ड चोकर, मोठे झुमके किंवा लेअर्ड नेकलेस घालून साडीचा लूक अधिक आकर्षक बनवा.

Saree Jewellery Styling Tips | Dainik Gomantak

साडीच्या प्रकारानुसार दागिन्यांची निवड

पारंपरिक सिल्क साडीवर 'टेम्पल ज्वेलरी' किंवा 'मोत्यांचे दागिने' (Pearl), तर ट्रेंडी/इंडो-वेस्टर्न साडीवर 'अन्कट डायमंड' किंवा 'पर्ल-स्टोन' डिझाईन्स खूप सुंदर दिसतात.

Saree Jewellery Styling Tips | Dainik Gomantak

'लेस इज मोर'चा नियम पाळा

गळ्यात हेव्ही किंवा मोठा हार घालणार असाल, तर कानातले छोटे (Studs) ठेवा. आणि जर कानात मोठे झुमके घालणार असाल, तर गळा मोकळा ठेवा.

Saree Jewellery Styling Tips | Dainik Gomantak

बांगड्या अन् अंगठी विसरू नका

साडीच्या लूकला परिपूर्ण करण्यासाठी एका हातात स्टेटमेंट रिंग (मोठी अंगठी) आणि दुसऱ्या हातात कडा किंवा साडीच्या रंगाशी जुळणाऱ्या काचेच्या बांगड्या घाला.

Saree Jewellery Styling Tips | Dainik Gomantak

'या' 7 सोप्या टिप्सने मिळवा स्टायलिश अन् एलिगंट लुक

Contrast Blouse Ideas | Dainik Gomantak
येथे क्लिक करा