Akshata Chhatre
रमझान इस्लाम धर्मामधील अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यात मुस्लिम समाज उपवास धरत ईश्वराची प्रार्थना करतो.
रमझानमध्ये उपवास ठेवणे आवश्यक आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न, पाणी आणि इतर काही गोष्टींपासून वंचित राहणे गरजेचे समजले जाते.
मझानमध्ये दान देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुस्लिम लोक जास्तीत जास्त गरजू लोकांना मदत करतात.
रमझान महिना हाच तो महिना आहे, जेव्हा मुस्लिम लोक नियमितपणे कुराणाचे पठण करण्यासाठी विशेष प्रयत्न करतात.
उपवासाच्या अखेर, सूर्यास्तानंतर मुस्लिम इफ्तार करतात. साधारणतः खजूर, पाणी, आणि हलके पदार्थ खातात.दानदान
रमझान महिन्यात विशेष तऱावी नमाज वाचन केले जाते. हा पवित्र रितीरिवाज मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
रमझान महिन्यानंतर मुस्लिम समाज ईद उल-फित्र साजरी करतो. हा एक आनंदाचा दिवस असतो.