Akshata Chhatre
औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा सहावा सम्राट होता. त्याने भारतीय उपखंडावर राज्य केले.
१६१८ मध्ये शाहजहान आणि मुमताझ महल यांच्या पोटी त्याने जन्म घेतला. त्याने लहान वयातच सैनिकी कौशल्य दाखवले. आपल्या भावांसोबत राजसिंहासनासाठी लढाईनंतर १६५८ मध्ये तो सम्राट बनला.
औरंगजेबाच्या राजवटीत मुघल साम्राज्याने आपला सर्वात मोठा भौगोलिक विस्तार पाहिला. कश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत, बंगालपासून गुजरातपर्यंत त्याचे साम्राज्य पसरले.
औरंगजेब आपली कट्टर इस्लामिक धार्मिक धोरणे अंमलात आणत होता. त्याने अनेक मंदिरे पाडली आणि गैर-मुसलमानांवर जास्त कर लावले.
सध्या गाजणाऱ्या छावा या चित्रपटामध्ये अक्षय खन्नाने क्रूर आणि सत्तेसाठी लढणारा औरंगजेब साकारला आहे. त्याच्या अभिनयाने औरंगजेबाच्या व्यक्तिमत्वाची तीव्रता दिसून येते.
खन्ना हा खरा 'पॉवरहाउस' अभिनेता आहे. त्याची स्क्रिनवरील अभिनाय काला अत्यंत बहुआयामी आहे.