Akshata Chhatre
पावसाळा सुरू झाला की दमट हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे सर्दी, ताप, त्वचाविकार, अपचन यांसारखे त्रास वाढतात. यावर घरगुती उपायच प्रभावी ठरतात.
हळदीतील कर्क्युमिन हा घटक शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो आणि संक्रमणाशी लढतो. रोज सकाळी उपाशीपोटी अर्धा चमचा हळद + एक चमचा मध घ्या.
पावसाळ्यात आले, तुळस, मिरे आणि दालचिनी घालून तयार केलेला काढा फुफ्फुसं मजबूत करतो आणि सर्दी, खोकला, अंगदुखीपासून आराम देतो. रात्री झोपण्यापूर्वी घ्या.
तूपात परतलेली २–३ लसूण पाकळ्या गरम दुधात मिसळा. त्यात थोडी हळद व गूळ घालून प्या. सांधेदुखी कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रोज आवळ्याचा रस किंवा आवळा पावडर + मध सेवन केल्याने रक्त शुद्ध होतं, त्वचा उजळते आणि व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.
सकाळी गरम पाण्यात लिंबू, मध व थोडी हळद टाकून घ्या. यामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि ताजं वाटतं. गरम भाज्यांचं सूपही रोगप्रतिकारशक्ती वाढवतं.