Manish Jadhav
वाढता पारा आणि घामामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. पण काळजी करु नका, या 7 सुवर्ण नियमांनी तुमची त्वचा दिवसभर ताजीतवानी राहील.
त्वचेला आतून हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसातून किमान 3-4 लिटर पाणी प्या. यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
बाहेर जाण्यापूर्वी 20 मिनिटे आधी SPF 30+ असलेले सनस्क्रीन आवर्जून लावा. दर 3 तासांनी ते पुन्हा लावल्यास त्वचेचे टॅनिंगपासून संरक्षण होते.
घामामुळे चेहऱ्याची छिद्रे बंद होतात. त्यामुळे दिवसातून दोनदा 'सल्फेट-फ्री' किंवा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा, जेणेकरुन घाण साचणार नाही.
उन्हाळ्यात क्रीम-बेस्ड मॉइश्चरायझर ऐवजी 'जेल-बेस्ड' किंवा 'वॉटर-बेस्ड' मॉइश्चरायझर वापरा. यामुळे त्वचा चिकट न होता मऊ राहते.
आहारात काकडी, टरबूज, संत्री आणि लिंबू सरबत यांचा समावेश करा. यातील जीवनसत्त्वे उन्हाळ्यातील 'स्किन डॅमेज' रोखण्यास मदत करतात.
घरच्या घरी चंदन, मुलतानी माती किंवा कोरफड जेलचा फेसपॅक लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि अतिरिक्त तेल निघून जाते.
त्वचेसोबतच डोळ्यांचेही रक्षण करा. बाहेर पडताना गडद रंगाचे सनग्लासेस वापरा आणि शक्यतो फिकट रंगाचे सुती कपडे परिधान करा.