Akshata Chhatre
तुमचा लाजरा स्वभाव तुमचा दोष नाही. आधी स्वतःचा आदर करा आणि तुमच्या भावना स्वीकारा, यानंतरच तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवू शकणार आहात.
सगळ्यात आधी लाजरा स्वभाव सोडताना दैनंदिन आयुष्यात किरकोळ संभाषण सुरू करा, जसे की दुकानदाराशी 2-3 वाक्य बोलणे हे महत्वाचं आहे.
“मी बोलू शकत नाही” या विचाराऐवजी, “मी प्रयत्न करतोय” असे विचार मनात आणा.
दररोज एक नवा संवाद किंवा समाजमाध्यमावर एक पोस्ट लिहा.
आत्मविश्वास वाढवण्यासाठी ज्ञान मिळवा. चांगले कोचिंग आणि वाचन उपयोगी ठरेल. सर्वच लोक परफेक्ट नसतात. चुका झाल्या तर त्यातून शिका, घाबरू नका.