Glowing Skin: चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो; दररोजच्या दिनचर्येत करा 'हे' 7 छोटे बदल

Sameer Amunekar

दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी १ ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचा आतून स्वच्छ होऊन नैसर्गिक चमक येते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

सीटीएम रूटीन फॉलो करा

दररोज न चुकता क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करा. यामुळे त्वचेवरील धूळ आणि तेल निघून जाते आणि त्वचा हायड्रेटेड राहते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

पुरेशी झोप आणि विश्रांती

त्वचेच्या पेशींच्या दुरुस्तीसाठी ७-८ तासांची शांत झोप अत्यंत आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात आणि चेहरा टवटवीत दिसतो.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

पाण्याचे भरपूर सेवन

दिवसभरात किमान ३-४ लिटर पाणी प्या. त्वचेला ओलावा मिळाल्यास ती मऊ आणि लवचिक राहते, ज्यामुळे अकाली सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

सनस्क्रीनचा नियमित वापर

घराबाहेर पडताना किंवा घरात असतानाही सनस्क्रीन लावायला विसरू नका. हे सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते आणि काळे डाग पडू देत नाही.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

सकस आहार आणि फळे

जेवणामध्ये पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. व्हिटॅमिन-सी युक्त फळे (जसे की संत्री, लिंबू) त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

रात्री चेहरा धुवून झोपणे

दिवसभर चेहऱ्यावर साचलेली घाण आणि मेकअप रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेची छिद्रे (Pores) मोकळी होतात आणि त्वचा श्वास घेऊ शकते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

घरच्या घरी मिळवा चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो, फॉलो करा 'या' टिप्स

Korean Skin Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा