Manish Jadhav
अनेकजण फक्त कडक उन्हात जाताना सनस्क्रीन लावतात, परंतु घरात असताना किंवा ढगाळ वातावरणातही घातक अतिनील (UV) किरण त्वचेचे नुकसान करु शकतात.
चेहऱ्यासाठी किमान दोन बोटांइतके सनस्क्रीन लावणे गरजेचे असते; खूप कमी प्रमाणात लावल्यास त्वचेला पूर्ण संरक्षण मिळत नाही.
सनस्क्रीन लावल्याबरोबर ते काम करत नाही. ते त्वचेमध्ये पूर्णपणे शोषले जाण्यासाठी घराबाहेर पडण्याच्या किमान 15 ते 20 मिनिटे आधी लावणे आवश्यक आहे.
एकदा सनस्क्रीन लावल्यावर त्याचा प्रभाव साधारण 2 ते 3 तास राहतो. त्यामुळे सतत उन्हात किंवा बाहेर असल्यास दर 3 तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावले पाहिजे.
बहुतांश लोक सनस्क्रीन फक्त चेहऱ्याला लावतात आणि मान, कान व हातांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे या भागांची त्वचा काळवंडून अनइव्हन स्किन टोन होतो.
तेलकट त्वचेसाठी जेल-बेस्ड आणि कोरड्या त्वचेसाठी क्रीम-बेस्ड सनस्क्रीन वापरावे; चुकीचे प्रॉडक्ट निवडल्यास चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ॲलर्जी येऊ शकते.
भारतीय हवामानानुसार किमान 30 किंवा 50 SPF (Sun Protection Factor) असलेले सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे, तसेच एक्सपायरी डेट संपलेले सनस्क्रीन त्वचेला इजा पोहोचवू शकते.