Manish Jadhav
केळामधून शरीराला त्वरित ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स मिळतात, तर पीनट बटर स्नायूंना ताकद देण्याचे काम करते. व्यायामाच्या 30 मिनिटे आधी हे खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.
ओट्स हे कॉम्प्लेक्स कार्ब्सचा उत्तम स्त्रोत असल्याने व्यायामादरम्यान शरीराची एनर्जी दीर्घकाळ टिकवून ठेवतात. यामध्ये थोडे दूध आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करुन तुम्ही खाऊ शकता.
ब्लॅक कॉफीमधील कॅफिन मेटाबॉलिझम वाढवते आणि वर्कआउट दरम्यान शरीरातील फोकस व स्टॅमिना दुप्पट करते. जिम सुरु करण्याच्या 15-20 मिनिटे आधी साखरेशिवाय ही कॉफी प्यावी.
अंड्यांमध्ये दर्जेदार प्रोटीन आणि अमिनो अॅसिड्स असतात, जे व्यायामादरम्यान स्नायूंची झीज रोखण्यास मदत करतात. वर्कआउट आधी फक्त अंड्याचा पांढरा भाग खाणे अधिक योग्य मानले जाते.
ब्राऊन ब्रेडमधून शरीराला आवश्यक ग्लुकोज मिळते आणि पनीर किंवा टोफू शरीराला संथ गतीने प्रोटीन पुरवठा करतात. यामुळे हे एक परिपूर्ण आणि हलके प्री-वर्कआउट मील मानले जाते.
सफरचंदामधील नॅचरल शुगर आणि फायबर शरीराला थकवा जाणवू देत नाहीत, तर बदामातून हेल्दी फॅट्स मिळतात. हा पर्याय अशा लोकांसाठी उत्तम आहे ज्यांना जिमआधी जड अन्न खायला आवडत नाही.
रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि उत्तम कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला संथ आणि स्थिर गतीने ऊर्जा देतात. जिममध्ये हेवी वेट ट्रेनिंग करणाऱ्यांसाठी उकडलेले रताळे खाणे अत्यंत गुणकारी ठरते.