Sameer Amunekar
कोकणची शान म्हणजे तारकर्लीचा समुद्रकिनारा. इथलं पारदर्शक पाणी आणि स्कुबा डायव्हिंगचा अनुभव तुम्हाला मालदीवची आठवण करून देईल.
समुद्राच्या लाटांशी झुंज देणारा हा अभेद्य जलदुर्ग पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. इथली तटबंदी आणि शिवरायांच्या पाऊलखुणा अंगावर रोमांच आणतात.
थंड हवामान आणि चहूबाजूंनी पसरलेली निसर्गदत्त हिरवळ यामुळे दापोलीला कोकणचे 'मिनी महाबळेश्वर' म्हटले जाते. इथले कर्दे आणि लाडघर किनारे अतिशय शांत आहेत.
रत्नागिरीतील गणपतीपुळे हे केवळ धार्मिक स्थळ नसून, इथला समुद्रकिनारा आणि डोंगररांगा मनाला शांती देतात. समुद्रकिनाऱ्यावर असलेले स्वयंभू गणपतीचे मंदिर पाहण्यासारखे आहे.
नारळ-पोफळीच्या बागा आणि अतिशय स्वच्छ असा अथांग समुद्रकिनारा म्हणजे गुहागर. शहराच्या गोंगाटापासून दूर शांतता हवी असेल, तर हे ठिकाण बेस्ट आहे.
ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी वेळास प्रसिद्ध आहे. निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण असून इथली ग्रामसंस्कृती आणि घरगुती पाहुणचार मनाला भुरळ घालतो.
निसर्गाची किमया पाहायची असेल तर राजापूरला नक्की भेट द्या. ठराविक काळाने प्रकट होणारी ही 'गंगा' आणि धूतपापेश्वर मंदिर हे कोकणच्या पर्यटनातील महत्त्वाचे टप्पे आहेत.