Sameer Amunekar
रात्रभर शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स पाण्यामुळे बाहेर टाकले जातात, त्यामुळे शरीर स्वच्छ राहते.
पाणी पिल्याने जठरातील पचनसंस्था सक्रीय होते आणि अन्नाचे योग्यरीत्या पचन होण्यास मदत होते.
सकाळी पाणी पिल्यास शरीरातील मेटॅबोलिक दर वाढतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
शरीरात पाणी पुरेसं असल्यास त्वचेतील ओलसरपणा टिकतो, आणि नैसर्गिक चमक वाढते.
पाणी मेंदूपर्यंत पोहोचल्याने थकवा कमी होतो, जागरूकता वाढते आणि मानसिक ताजेपणा मिळतो.
ऍसिडिटी, गॅसेस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
सकाळी पाणी प्यायल्याने रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते, विशेषतः हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांसाठी फायदेशीर.