Sameer Amunekar
संगीत मन शांत करतं, त्यामुळे चिंता आणि तणाव दूर होतो. सॉफ्ट म्युझिक किंवा क्लासिकल संगीत तणाव कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरतं.
अभ्यास करताना हलकं संगीत ऐकल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे लक्ष केंद्रित करणं सोपं जातं.
शांत आणि सुमधुर संगीत झोप लागण्यास मदत करतं. त्यामुळे अनिद्राचे त्रास असणाऱ्यांसाठी फायदेशीर.
संगीत ऐकताना हृदयाचे ठोके नियंत्रित होतात, रक्तदाब स्थिर राहतो, आणि मन शांत राहतं – यामुळे हृदय आरोग्य सुधारतं.
काही संशोधनांनुसार, संगीत थेरपीमुळे शारीरिक वेदना कमी होतात, विशेषतः हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दिलं जाणारं संगीत वेदना सहन करण्यास मदत करतं.
ध्यानधारणेसाठी वापरलं जाणारं संगीत मनाला स्थिर करतं, अंतर्मुख होण्यास मदत करतं.
आवडतं संगीत ऐकताना "डोपामीन" नावाचा आनंद देणारा हार्मोन शरीरात स्रवतो, त्यामुळे मूड सुधारतो आणि आनंद मिळतो.