Sameer Amunekar
तिचं बोलणं मनापासून ऐकणं हा प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. तिला काय वाटतंय, काय त्रास देतोय, हे शांतपणे ऐका.
रोजच्या धकाधकीत संवाद तुटतो. दररोज थोडा वेळ एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला द्या – दिवस कसा गेला, काही खूप चांगलं किंवा वाईट घडलं का, हे शेअर करा.
कधी एखादं गोड ग्रीटिंग कार्ड, आवडती मिठाई, किंवा तिच्या आवडीचं काहीतरी अचानक देणं हे तिला खास वाटायला लावतो.
फक्त कमावणं हेच जबाबदारी नाही. स्वयंपाक, मुलांची काळजी, किंवा घरातील छोट्या गोष्टींमध्ये हातभार लावा – यामुळे तिचा तणाव कमी होतो.
ती जे करते. घर, मुलं, काम – त्यासाठी तिला ‘थॅंक यू’, ‘तू खूप छान करतेस’ असं म्हणणं खूप मोठा फरक घडवू शकतं.
वर्क-लाइफ बॅलन्स जपणं गरजेचं आहे. आठवड्यातून एक वेळ फक्त तिच्यासाठी काढा – बाहेर जेवायला घेऊन जा, एकत्र चालायला जा, किंवा घरातच एक खास संध्याकाळ घालवा.