Sameer Amunekar
पाहुण्यांसमोर भांडणं किंवा तीव्र बोलाचाली करणं नात्याची प्रतिमा आणि घरातील वातावरण खराब करतं.
विनोदाच्या नावाखाली जोडीदाराची खिल्ली उडवणं किंवा त्याच्या कमतरतांवर हसणं हे अपमानास्पद वाटू शकतं.
आपल्या नात्यातील खाजगी गोष्टी, वैवाहिक मतभेद किंवा बेडरूमशी संबंधित गोष्टी पाहुण्यांपुढे बोलू नयेत.
पाहुण्यांसमोर अतिप्रम दर्शवणं (जसं की सतत मिठी मारणं, चुंबन घेणं) हे अस्वस्थतादायक ठरू शकतं.
"हे कधीच मदत करत नाही", "नेहमी उशिरा उठतो" अशा प्रकारच्या तक्रारी पाहुण्यांसमोर केल्यास नकारात्मक छाप पडते.
जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष न देणं, त्याला कमी लेखणं किंवा मुद्दाम दुर्लक्ष करणं हे गैरसोयीचं आणि असभ्य वाटू शकतं.