Akshay Nirmale
पणजीतील आयनॉक्स थिएटर हे इफ्फी चे मुख्य केंद्र आहे. महोत्सवातील महत्वाचे चित्रपट, घडामोडी, रेडकार्पेट येथेच होत असतात.
गोवा एंटरटेन्मेंट सोसायटीचे कार्यालय आहे. मॅक्विनेझ पॅलेस, अशोका ऑडी ही ठिकाणेदेखील पणजी आयनॉक्स परिसरातच आहेत. त्यामुळे हा परिसर इफ्फी काळात गजबजलेला असतो.
सध्या इफ्फीला सुरवात होऊन एकच दिवस झाला आहे. त्यासाठी आयनॉक्स परिसर नटला आहे. येथे विविध चित्रपट कॅरेक्टर्सचे कटआऊट्स उभारले आहेत.
पणजी आयनॉक्स परिसरात चार मोठ्या स्क्रीन्स आहेत. तेथे इफ्फीतील महत्वाच्या घडामोडी दाखवल्या जात आहेत.
सिनेस्टार, सिनेतारका ज्या रेड कार्पेटवर अवतरणार ते देखील याच आयनॉक्ससमोर आहे.
रेडकार्पेटवर जाण्यासाठी जे व्यासपीठ उभारले आहे ते लक्ष सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
डेलिगेट्सच्या मदतीसाठी आयनॉक्सच्या तिकिट काऊंटरबाहेर हेल्प डेस्क करण्यात आला आहे. डेलिगेट्सच्या सर्व शंकांचे निरसन तिथे केले जात आहे.