Sameer Amunekar
तुमचं खरं व्यक्तिमत्त्व काय आहे हे कळणं नेहमीच रंजक असतं.
तुम्ही शांतपणे ऐकता का, की लगेच प्रतिक्रिया देता? शांत लोक संयम राखतात, हुशार लोक मुद्दा समजून बोलतात, तर हट्टी लोक स्वतःचंच बरोबर मानतात.
निर्णय घेताना सर्व बाजू विचारात घेता का, की आपलं म्हणणं कायम ठेवता? हुशार व्यक्ती विवेकी निर्णय घेतात, तर हट्टी लोक कोणतीही शंका न घेता ठरलेलं करतात.
संकटाच्या वेळी शांत राहता का, घाबरता, की हट्ट धरता? शांत लोक स्थिती सांभाळतात, हुशार लोक उपाय शोधतात, तर हट्टी लोक चुकीवरही ठाम राहतात.
समोरचं मत पटलं तरी तुम्ही बदलता का? हुशार व्यक्ती योग्य वाटलं तर मत बदलतात, हट्टी लोक मात्र अजिबात नाही.
तुम्ही ती समजून घेता की लगेच विरोध करता? शांत लोक आत्मपरीक्षण करतात, हुशार लोक सुधारणा करतात, पण हट्टी लोक लगेच नाराज होतात.