Akshata Chhatre
लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकत्र जगणं असतं. सुरुवातीचा रोमँटिक काळ संपल्यानंतर वास्तव दिसू लागतं तिथे संवादाचा अभाव, अपेक्षा, आणि विसंवाद उगम पावतो.
मनापासून संवाद साधा
"मी तुझं ऐकतो" एवढं पुरेसं नाही, "मी तुला समजतो" हे जाणवायला हवं. रोज काही वेळ फक्त एकमेकांसाठी ठेवा.
छोट्या कृतीत प्रेम शोधा
गिफ्टपेक्षा एका कप चहा, एकत्र चालणं, किंवा एक हलकी मिठी यांमध्येच खरी जवळीक असते.
प्रत्येकात चांगुलपणा शोधा
जोडीदाराच्या चांगल्या गुणांचं कौतुक करा. प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठे प्रसंग लागतात असं नाही.
आपण ही भावना जोपासा
निर्णय घेताना दोघांच्या भल्याचा विचार करा. मतभेद संवादात बदलण्यासाठी अहंकार बाजूला ठेवणं महत्त्वाचं.
माफ करणं आणि स्वीकार करणं
कोणीच परिपूर्ण नसतं. चुकल्यावर समजून घेणं आणि माफ करणं यामध्येच प्रेमाचं खरं रूप दडलेलं असतं.