गोमन्तक डिजिटल टीम
केसांचे आरोग्य जास्त खराब होते ते हिवाळ्यात. हवा कोरडी असल्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे, त्वचा कोरडी होणे, टाळूला खाज येणे यासारख्या समस्या दिसून येतात.
केसांची निगा हिवाळ्यामध्ये कशी राखायची हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
केसांना, टाळूवर थोडेसे कोमट तेल मसाज केल्याने केसांच्या मुळांचे पोषण होण्यास मदत होईल.
जास्त वेळा केस धुण्याचा मोह टाळावा. आठवड्यातून जास्तीत जास्त दोनदा केस धुणे योग्य राहील.
शाम्पू केल्यानंतर कंडिशनर कधीही वगळू नका. केसांना कंडिशन करण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागतात.
हिवाळ्यातील हवेत ओले केस जास्त प्रमाणात तुटतात. हिवाळ्यातच नाही तर कोणत्याही हंगामात ओल्या केसांनी बाहेर पडणं टाळा
केस निरोगी ठेवण्यासाठी तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावितो