Sameer Amunekar
भारतीय इतिहासात असे अनेक पराक्रमी राजा होऊन गेले, ज्यांनी मुघलांच्या दडपशाहीला सडेतोड प्रतिकार केला. जाणून घेऊया त्या महान राजांविषयी.
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. सत्तेला जबरदस्त आव्हान देणारे आणि स्वराज्याचा बुलंद नारा देणारे हे एकमेव राजा होते. अफजल खानाचा वध, पुरंदरची लढाई, आग्र्याहून सुटका अशा अनेक पराक्रमांनी मुघलांची झोप उडवली.
महाराणा प्रताप हे मेवाडचे स्वाभिमानी शूर राजा. हल्दीघाटीच्या युद्धात अकबराच्या सेनापती मान सिंहाशी लढताना त्यांनी अपराजित वृत्ती दाखवली. जंगलात राहूनही त्यांनी कधी मुघलांसमोर झुकणं स्वीकारलं नाही.
सिंध प्रदेशातील 'शेर-ए-पंजाब'. दिल्लीजवळ मुघल सत्तेचा प्रभाव असतानाही त्यांनी अफगाणांपासून ते मुघलांपर्यंत सगळ्यांना शह दिला. पंजाबला बलशाली बनवणाऱ्या आणि धर्मनिरपेक्ष धोरण ठेवणाऱ्या राजांपैकी एक.
श्रीमंत बाजीराव पेशवे एक असे सेनापती जे "झुंजार, चपळ आणि अचूक" होते. उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता विस्तारण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. दिल्लीच्या उंबरठ्यावर मराठ्यांची शक्ती पोहोचवली.
राजपूत महासंघाचे वीर सेनानी. बाबरशी खानवा युद्ध लढून मुघल सत्तेला आव्हान देणारे पहिले मोठे भारतीय राजा. एक हात, एक पाय गमावूनही युद्धभूमीत टिकून राहिले आणि स्वाभिमानाची मशाल पेटती ठेवली.