गोमन्तक डिजिटल टीम
ख्रिसमसचा सण गोव्यात खास असतो. या सणाला मिठाया खास बनवल्या जातात!
महत्वाचे म्हणजे या सर्व मिठाया सहजपणे घरच्या घरी तयार करता येतात.
ही छोटी कुरकुरीत गोड मिठाई, ख्रिसमस सणाची खासियत आहे. गहू पीठ व नारळाच्या दुधातून तयार होणारा हा पारंपरिक पदार्थ खूप लोकप्रिय आहे.
नारळाचे दूध, गूळ व तांदळाच्या पिठातून बनवले जाणारे, दोदोल ही गोडसर मिठाई गोव्यात ख्रिसमसच्या दिवशी महत्वाची मानली जाते.
नारळ आणि रव्याचा केक, बाथ हा ख्रिसमसच्या पदार्थांपैकी एक प्रकार आहे. त्याचा स्वाद आणि टेक्स्चर सणाची मजा वाढवतो.
नारळ, तांदूळ आणि गूळ वापरून बनवलेले पिनागर, ख्रिसमसच्या वेळी गोव्याच्या घरांमध्ये पाहायला मिळेल.
नाशपतीच्या जॅमसारखा हा पदार्थ साखर आणि रसाने तयार होतो. ख्रिसमस ट्रीच्या सजावटीप्रमाणेच पेराड सणात रंग भरतो.