Sameer Amunekar
हृदयाच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी, काही पदार्थ खाणं टाळायला हवं. खाली दिलेले ५ पदार्थ हृदयाच्या आजारांसाठी हानिकारक ठरू शकतात.
तळलेल्या किंवा जास्त तेलात तोंडलेल्या पदार्थांमध्ये ट्रांसफॅट्स आणि सोडियम जास्त असतो, जे हृदयावर ताण आणतात.
जास्त मीठ असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो, जो हृदयाच्या आजाराचा धोका वाढवतो. हृदयरोग टाळण्यासाठी मीठाची मात्र कमी करा.
पॅकेज्ड पदार्थांमध्ये जास्त शर्करा, सोडियम असतं, जे हृदयावर वाईट परिणाम करू शकतात.
गोड पदार्थांमध्ये असलेली जास्त शर्करा वजन वाढवते आणि हृदयाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकते.
जास्त प्रथिनं आणि सॅच्युरेटेड फॅट्स असलेले मांस हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. अधिक कमी फॅट्स असलेले प्रथिनं सेवन करा.