Manish Jadhav
तुम्ही सणासुदीच्या काळात 10 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये सुरक्षित कार घेण्याचा विचार करत असाल, तर या वेबस्टोरीतील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते.
किआ सायरॉस (Kia Syros) ही या यादीतील एक नवीन कार आहे, तिला प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.
या कारची एक्स-शोरुम किंमत 9 लाख रुपयांपासून सुरु होते आणि यात 6 एअरबॅग्ज तसेच लेव्हल 2 ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (ADAS) आहे.
टाटा नेक्सॉन (Tata Nexon) ने भारतात सुरक्षिततेचे नवे मापदंड सेट केले असून, तिला प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.
महिंद्रा XUV 3XO (Mahindra XUV 3XO) ला नुकतेच मोठे अपडेट मिळाले आहे. ही कारही लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी दोन्हीसाठी सुरक्षित असून तिलाही 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. याशिवाय, महिंद्रा XUV 3XO मध्ये 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा आणि ADAS सारखे आधुनिक फीचर्स आहेत.
स्कोडा कायलॅक (Skoda Kylaq) ही आणखी एक नवीन कार आहे. 7.89 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत तिला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, पण यात ADAS फीचर उपलब्ध नाही.
तसेच, या यादीत समाविष्ट असलेली टाटा पंच (Tata Punch) कमी बजेटमध्ये खूप लोकप्रिय आहे. तिला प्रौढ सुरक्षिततेसाठी 5-स्टार रेटिंग मिळाले आहे आणि ती देशातील सर्वाधिक विकली जाणारी दुसरी गाडी आहे.