Manish Jadhav
बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेक मानवाला अनेक आजार जडत आहेत.
याचदरम्यान, गेल्या काही वर्षात ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. ब्रेन ट्यूमर हा मेंदूतील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा एक गंभीर आजार आहे.
या धोकादायक आजाराची अशी पाच प्रमुख लक्षणे जी झोपेदरम्यान दिसतात. चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...
ब्रेन ट्यूमरचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे डोकेदुखी.
ब्रेन ट्यूमर असलेल्या रुग्णांना झोपेशी संबंधित समस्या उद्भवतात. निद्रानाश किंवा वारंवार झोप न येण्याचा त्रास ही या आजाराचे लक्षण आहे.
झोपेत अचानक जास्त घाम येणे किंवा अस्वस्थ वाटणे हे ब्रेन ट्यूमरचे संभाव्य लक्षण आहे.
तसेच, रात्री झटके येणे हे ब्रेन ट्यूमरचे गंभीर लक्षण आहे.
सकाळी उठताच उलट्या होत असतील तर हे ब्रेन ट्यूमरचे एक प्रमुख लक्षण असू शकते.