गोव्यातील शेवग्याच्या शेंगेचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'

Pramod Yadav

शेवग्याची शेंग

गोव्यातील शेवग्याच्या शेंगेचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.

49 इंच लांब

आके मडगाव येथील लक्ष्मण उर्फ महेश वागळे यांनी लावलेल्या झाडाला तब्बल 49 इंच शेवग्याची शेंग आली आहे.

वर्ल्ड रेकॉर्ड

वागळे यांनी इलाईट वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.

पाहणी

कृषि अधिकाऱ्यांनी शेंगेची पाहणी केली असता हा वर्ल्ड रेकॉर्ड असल्याचे समोर आले आहे.

अभिनंदनाचे पत्र

इलाईट वर्ल्ड रेकॉर्डकडून वागळे यांना अभिनंदनाचे पत्र देण्यात आले आहे.

जुना रेकॉर्ड

यापूर्वी बंगळुरुतील महिलेचा 46 इंच शेवग्याच्या शेंगेचा रेकॉर्ड होता.

विविध भाज्या

वागळे आपल्या परसबागेत विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेत असतात.