Manish Jadhav
आजच्या धकाधकीच्या जीवनात (Hectic Life) अनेकांना शांत झोप (Sound Sleep) न येण्याची समस्या भेडसावत आहे.
झोपेच्या अभावामुळे आरोग्यावर (Health) आणि दैनंदिन जीवनावर (Daily Life) नकारात्मक परिणाम होतो.
जर तुम्हालाही रात्री लवकर झोप येत नसेल, तर तुमच्या आहारात (Diet) काही खास पेयांचा (Drinks) समावेश करुन तुम्ही या समस्येवर मात करु शकता. ही पेये नैसर्गिकरित्या शरीराला आराम देतात आणि शांत झोपेसाठी मदत करतात.
झोपण्यापूर्वी एक कप दूध (Milk) पिणे हा झोपेसाठी एक पारंपरिक आणि प्रभावी उपाय आहे. दुधामध्ये ट्रिप्टोफॅन (Tryptophan) नावाचे अमिनो ऍसिड (Amino Acid) असते.
कॅमोमाइल चहा त्याच्या शांत आणि आरामदायक गुणधर्मांसाठी ओळखला जातो. यात एपिजेनिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे मेंदूला शांत करण्यास आणि निद्रानाशावर मात करण्यास मदत करते. झोपण्यापूर्वी एक कप कॅमोमाइल चहा घेतल्यास चांगली झोप लागते.
बदाम दुधात मॅग्नेशियम असते, जे स्नायूंना (Muscles) आराम देण्यासाठी आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
चेरी, विशेषतः टार्ट चेरी मेलाटोनिनचा नैसर्गिक स्रोत आहेत. झोपण्यापूर्वी एक ग्लास चेरीचा रस प्यायल्याने झोपेचे नियमन सुधारते आणि झोपेचा कालावधी वाढतो.
केवळ पेय पिण्यानेच नव्हे, तर झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणे टाळणे, शांत आणि अंधारे वातावरण ठेवणे आणि नियमित झोपेची वेळ पाळणे हे उपायही शांत झोपेसाठी महत्त्वाचे आहेत.