Manish Jadhav
सरत्या वर्षाला बाय-बाय करत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनप्रेमी गोवा सज्ज झाला आहे.
2024 मधील शेवटचा दिवस म्हणजेच 31 डिसेंबरला तुम्ही गोव्यात असाल तर इथलं हटके न्यू ईयर सेलिब्रेशन तुम्हाला मनमोहित करेल.
गोव्यातील पार्टी माहोल प्रत्येकाला खुणावतो. पर्यटकांची जान असणारा गोवा न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी सज्ज झाला आहे. कॅसिनो, क्लब, हॉटेल्स पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर उभं राहून सरत्या वर्षातील बुडणाऱ्या सूर्यनारायणाला अलविदा करुन नव्या वर्षाची पहाट अनुभवण्याचा सुनेरी मोका तुम्ही बिलकुल मीस करु नका. तुमचं हे न्यू ईयर सेलिब्रेशन यादगार बनेल.
गोवा म्हटलं की, मौज-मजा-मस्ती आणि पार्टी माहोल डोळ्यांसमोर तरुळून जातो. आजच्या दिवशी (31 डिसेंबर) डान्स ऑन दि प्लोरवर थ्रिलर गाण्यावर थिरकण्याची मजा काही औरचं आहे.
न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गोव्यात पहिल्यांदा पोहोचलेले पर्यटक गजबजलेले समुद्रकिनारे सोडून शांत समुद्रकिनाऱ्यावर न्यू ईयर सेलिब्रेशन साजरं करण्याला अधिक महत्व देतायेत.