गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यातील किती लोकांनी मागच्या दहा वर्षात भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून इतर देशांतील नागरिकत्वाचा स्वीकार केला आहे ही माहिती अलीकडेच समोर आली आहे.
यासंदर्भात गोव्याचे विरोधी पक्षनेते आमदार युरी आलेमाव यांनी विधानसभेत अतारांकित प्रश्न दाखल केला होता.
१ जानेवारी २०१४ ते ३१ मार्च २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत गोव्यातील २५,९३९ नागरिकांनी इतर देशांतील नागरिकत्वाचा स्वीकार केल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
२०१६ मध्ये सर्वाधिक ४१२१ जणांनी तर २०२१ मध्ये सर्वांत कमी म्हणजे ९५४ जणांनी भारतीय नागरिकत्व सोडल्याची माहिती समोर आली.
ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया संदर्भात नागरिकांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सरकारने काय केले, याची मागणी आलेमाव यांनी केली. यासंदर्भात सरकारकडून कोणतेही प्रतिज्ञापत्र दाखल केले न्हवते.
गोव्याचे नागरिकत्व सोडून इतर देशात स्थानिक होणाऱ्या लोकांची जास्त पसंती पोर्तुगालला आहे.
गोवा मुक्तीपूर्वीचे पोर्तुगीज वसाहतींचे संदर्भ फार महत्वाचे आहेत . पोर्तुगीज कायद्यानुसार गोव्यातील लोक तिथल्या विशिष्ट अटी पळून पोर्तुगीज राष्ट्रीयत्वासाठी अर्ज करू शकतात.
कला अकादमीसाठी कलाकारांचा 'द क्राय'