Manish Jadhav
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी येत्या काही महिन्यांत अपडेटेड थार 3-डोअर आणि बोलेरो निओ ही दोन नवीन मॉडेल्स लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
नवीन महिंद्रा थारमध्ये डबल-स्टॅक्ड स्लॉटसह नवीन ग्रिल डिझाइन आणि C-आकाराचे एलईडी हेड-लॅम्प आणि टेल-लॅम्प असतील.
थारच्या इंटिरियरमध्ये मोठ्या अपग्रेडसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळेल.
सध्याच्या हाइड्रोलिक पॉवर स्टीअरिंगऐवजी नवीन थ्री-स्पोक इलेक्ट्रिक पॉवर स्टीअरिंगचा समावेश असेल.
वायरलेस फोन चार्जर, फ्रंट आर्मरेस्ट आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारखी आधुनिक फीचर्स जोडली जातील.
पॉवर विंडोचे स्विच आता डोअरवर असतील, जे वापरण्यास अधिक सोयीचे असतील.
नवीन थारमध्ये सध्याचेच 2.0L टर्बो पेट्रोल आणि 1.5L/2.2L टर्बो डिझेल इंजिन पर्याय कायम राहतील.
अधिक प्रीमियम फीचर्स आणि स्टायलिंगमुळे नवीन थारच्या किमतीत सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.
Flax Seed Benefits: मधुमेह आणि कर्करोगापासून संरक्षण; 'सुपरफूड' जवस आरोग्यासाठी गुणकारी